डेन्मार्कच्या वैज्ञानिकांनी डाटा ट्रान्सफर करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे एका सेकंदात 43 टेराबाइट म्हणजे 44,032 जीबी डाटा ट्रान्सफर करता येतो. यापूर्वी र्जमनीच्या काल्र्सरूहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने एका सेकंदात 32 टेराबाइट डाटा ट्रान्सफर करून विक्रम नोंदवला होता.
इंटरनेटच्या माध्यमातून डाटा ट्रान्सफरची वाहतूक सध्या दरवर्षी 50 टक्के वेगाने वाढत आहे. त्यामुळे हे संशोधन ऐतिहासाकी कलाटनी देणारे ठरले आहे. सध्याच्या हळुवार गतीमुळे इंटरनेटचा अतिवापर कार्बन उत्सर्जनास कारणीभूत ठरत आहे. जगभरातील सध्याच्या कार्बन उत्सर्जनात इंटरनेटचा 2 टक्के वाटा आहे. प्रतिसेकंद 43 टेराबाइटचा वेग मिळवण्यासाठी संशोधकांनी ऑप्टिकल फायबरचा वापर केला आहे. हे फायबर जपानच्या एनएनटी या टेलिकॉम कंपनीकडून घेण्यात आले होते. यात स्टँडर्ड फायबरसारखे सिंगल कोर नसून वेगवेगळे सात कोर आहेत. त्यामुळे अधिक डाटा ट्रान्सफर करता येऊ शकतो.
SPEED वाढवण्यासाठी लेजरचा वापर-
संशोधनामुळे याआगोदर जास्तीत जास्त संयुक्त डाटा ट्रान्सफर करण्याची स्पीड तयार करण्यात आली. यामुळे एक सेंकदामध्ये 1000 टेराबाइट डाटा ट्रान्सफर करता येणार आहे. SPEED वाढवण्यासाठी ऑप्टिकल फायबरच्या ऐवजी लेजर्सचा वापर करण्यात आला आहे.
ऑप्टिकल फायबरची मदत-
43 टेराबाइट प्रति सेंकद SPEED मिळवण्यासाठी या संशोधनात ऑप्टिकल फायबरचा वापर केला आहे. जपानची कंपनी एनएनटीकडून हे फायबर घेण्यात आले. या फायबरमध्ये सात कोर असल्यामुळे जास्तीत जास्त डाटा ट्रान्सफर करता येतो.