आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World's Beutiless Woman Body Buried After 150 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात कुरूप महिलेचे पार्थिव 150 वर्षांनंतर दफन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी - जगातील सर्वात कुरूप महिला म्हणून परिचित असलेल्या ज्युलिया पेस्टरानाच्या पार्थिवाला 150 वर्षांनंतर अखेर सन्मानपूर्वक दफन करण्यात आले. एकोणिसाव्या शतकात ज्युलियाची कुरूपता जगात ओळखली जात होती. त्यांच्या संपूर्ण चेह-या वर मोठ्या प्रमाणात केस होते. त्यामागे आनुवंशिक कारण सांगितले गेले. तोंडाचा भागही खूप बाहेर आलेला होता. त्या कारणाने त्यांना अस्वल महिला म्हणून संबोधले जात.

1834 मध्ये जन्मलेल्या मेक्सिकोमध्ये ज्युलिया 1850 मध्ये अमेरिकेतील एका सर्कसचे मालक थिओडोरे लेंट यांना भेटल्या. त्यानंतर दोघांनी विवाह केला होता. त्यांचा मृतदेह मेक्सिकोमध्ये आणण्याचा प्रयत्न 2005 मध्ये मेक्सिकोची कलाकार अँडर्सन बार्बाटा यांनी केले. त्याचे समर्थन अधिका-या कडूनही करण्यात आले होते. मृत्यूच्या दीडशे वर्षांनंतर त्यांच्या नशिबी अंत्यसंस्कार आले.

संघर्ष आणि निरोप
आयुष्यभर कुरूपतेचा शाप घेऊन मिरवणा-याज्युलियाचा मृतदेह पांढ-यागुलाबांमध्ये झाकून दफन करण्यात आला. सिनालोओ द लेव्या शहरात त्यांना दफन करण्यात आले. ज्युलियाला आयुष्यभर किती अपमान सहन करावा लागला असेल, याची कल्पना करा; परंतु त्यांनी त्याच्या पलीकडे गेल्या होत्या. ही खूप गौरवपूर्ण गोष्ट आहे, अशी भावना सिनालोओचे राज्यपाल मारियो लोपेझ यांनी व्यक्त केली. ज्युलियावर अंत्यसंस्कार करणारे फादर जेमी रायस म्हणाले, एखादा व्यक्ती कोणासाठीही वस्तू असू शकत नाही.

मृतदेहाची चोरी
ज्युलियाच्या मृतदेहाने जगभरात प्रवास केला; परंतु त्यांचा हा प्रवास 1976 मध्ये नॉर्वेमध्ये येऊन थांबला. तेथे मृतदेहाच्या चोरीची घटना घडली; परंतु नंतर पोलिसांनी त्याला शोधून काढले. तेथून तो मृतदेह ओस्लो विद्यापीठात सुरक्षित ठेवण्यात आला. मात्र, आता त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रासायनिक प्रक्रिया
ज्युलियाच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने तिचा मृतदेह कधीही दफन केला नाही. उलट त्यावर रासायनिक प्रक्रिया करून जगभर तो शोमधून दाखवला.