आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती मॅन्युअल युराइबचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिको - एकेकाळी जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवणार्‍या 48 वर्षीय मॅन्युअल युराइब यांचे सोमवारी निधन झाले. हृदयाचे ठोके कमीजास्त होत असल्याने 2 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2006 मध्ये जेव्हा युराइब यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला तेव्हा त्यांचे वजन 558 किलो इतके होते. वजनामुळे गेल्या काही वर्षांपासून ते बेडवरच होते. युराइबने सांगितले की, 26 व्या वर्षी त्यांचे वजन 113 किलो होते. तेव्हा त्यांना अती खाण्याची घातक सवय लागली होती.
2008 मध्ये केले लग्न
युराइब यांनी 2008 मध्ये क्लाउडिया सॉलिस हिच्याशी विवाह केला. लग्नासाठी स्वत: चालत जावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी जवळपास 250 किलो वजन कमी केले होते. परंतु अचानक घटलेल्या वजनामुळे ते बेडवरून उठू शकले नाहीत. त्यांना क्रेनने बेडसह घराबाहेर काढावे लागले होते.