आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिले बिटकॉइन एटीएम सायप्रसमध्‍ये उघडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्य प्रवाहातील चलनांमध्ये झपाट्याने पुढे आल्यानंतर बिटकॉइन हे नाणे आता सायप्रसमध्ये जगातील पहिले बिटकॉइन एटीएम उघडण्यासाठी सज्ज आहे. बिटकॉइन हे एक विकेंद्रित चलन आहे. त्याची देवाणघेवाण वेबसाइट आणि अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाऊ शकते. बहुतांश लोकांनी याविषयी ऐकलेलेसुद्धा नाही. 2009 मध्ये सतोषी नाकामोटोने ते प्रचलनात आणले. एक बिटकॉइन 10 कोटी सतोषीश युनिटमध्ये विभागला जाऊ शकतो. त्याचे मूल्य झपाट्याने वाढत आहे. सध्या ते सर्वाधिक मूल्य 140 डॉलरपर्यंत पोहोचले आहे. मागील नोव्हेंबरमध्ये त्याची किंमत 10 डॉलर एवढी होती. मार्च महिन्याच्या मध्यात सायप्रसमध्ये उभे राहिलेले आर्थिक संकट पाहता युरोपीय देश आणि युरोपियन युनियन देशांच्या नागरिकांचा कल बिटकॉइनकडे वाढला. युरोला व्यावहारिक पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. एखाद्या व्यक्तीला बिटकॉइनच्या एटीएममध्ये बिटकॉइन जमा करून रक्कम काढता येईल किंवा रक्कम जमा करून बिटकॉइन घेता येईल. 30 देशांमध्ये 300 पेक्षा जास्त एटीएम लावण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे द डॉलर व्हिजिलेंटचे जेफ बेर्विक यांनी सांगितले.


wired.co.uk