आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिल्या ‘डाटा स्टोअरेज सिस्टिम’चा शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - ‘प्रागैतिहासिक सीडी’ हा शब्द विचित्र वाटतो ना, परंतु जगातील पहिल्या डाटा स्टोअरेज सिस्टिमचा शोध घेण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 5 हजार 500 वर्षांपूर्वीचे तंत्र सापडले आहे. मातीचे गोळे अशा स्वरूपात ही माहिती गोळा करण्यात येत होती. मेसोपोटोमिया संस्कृतीच्या काळातील हे तंत्र इतिहासपूर्व कालखंडातील आहे.

इराणमध्ये काही दस्तऐवज असलेले मातीचे गोळे सापडले आहेत. हे गोळे सीलबंद आहेत. काही गोळे बेसबॉलच्या आकारातील आहेत. संशोधकांनी सीटी स्कॅन, थ्रीडी मॉडेलिंगच्या माध्यमातून त्यावरील माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम इराणच्या छोगा मिश भागात हे गोळे सापडले. मेसोपोटामिया कालखंडात आर्थिक व्यवहारासाठी या गोळ्यांचा वापर केला जात होता. त्याशिवाय 3 हजार 300 वर्षांपूर्वीचे मातीचे संदेशवहन करणारे गोळे सापडले होते.