आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिले हर्बल कुराण दुबईत प्रकाशित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - जगातील पहिले संपूर्णरीत्या हाताने तयार केलेले हर्बल कुराण दुबईत प्रकाशित करण्यात आले आहे. या पवित्र कुराणच्या निर्मितीत २०० औषधी वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. इस्लामिक आर्टस अँड कॅलिग्राफिक कंपनीने या कुराणची निर्मिती केली आहे. या कुराणच्या निर्मितीसाठी २३ वर्षे लागली. १९५७ ते १९७९ या कालावधीत यावर काम करण्यात आले होते. तुर्किश युनानी डॉक्टर हमीद ताहेर यांनी यासाठी परिश्रम घेतले. युनानी पद्धतीने तयार करण्यात आलेल्या औषधी वनस्पतींच्या पत्रांवर कुराण लिहिण्यात आले आहे. या कुराणला ६०६ पाने असून त्याचे वजन ७.५ किलोग्रॅम आहे. यात कोणत्याही मुद्रणतंत्राचा वापर करण्यात आलेला नाही.जगातील ८० देशांतील १७१४ संग्रहालयांना अशा प्रकारचे कोणते पुस्तक संग्रही आहे का, या बद्दल विचारणा करण्यात आल्याचे निर्माता कंपनीने सांगितले. त्यानंतर अशा पद्धतीने तयार करण्यात आलेला हा एकमेव ग्रंथ असल्याचा दावा कंपनीने केला आहे.