आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 लाख रुपयांत विकले गेले जगातील पहिले SELFIE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - 1850 च्या दरम्यानच्या काळातील एक छायाचित्र हे जगातील पहिले सेल्फी असल्याचे समजण्यात आले आहे. व्हिक्टोरियन आर्ट फोटोग्राफर ऑस्कर गुस्तेव रेजलेंडर यांचे हे छायाचित्र नॉर्थ यॉर्कशायरच्या हॅरोगेटमधील मॉर्फेट्स या प्रदर्शनात या छायाचित्राचा लिलाव करण्यात आला. हे छायाचित्र सुमारे 70 लाख रुपयांत (70,000 पाउंड) विकले गेले आहे.

मॉर्फेट्सच्या लीज पेपरमधील माहितीवरून माध्यमांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार एक लेदरचे कव्हर असणा-या एका पुस्तकामध्ये हे सेल्फी छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. हे छायाचित्र स्वीडनच्या ऑस्कर गुस्तेव रेजलेंडर यांचे होते. त्यांना आर्ट फोटोग्राफीचे जनकही मानले जाते. या अल्बममध्ये गुस्तेव यांच्या पत्नीचे छायाचित्रही आहे.

PHOTO - ऑस्कर गुस्तेव यांचे सेल्फी