आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिली थ्री-डी प्रिंटेड इमारत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - एका डच वास्तुरचनाकाराने पृथ्वीच्या लँडस्केपपासून प्रेंरणा घेऊन जगातील पहिली 3 डी प्रिंटेड इमारत बांधण्याची योजना आखली आहे.जगभरात कुठेही ही 3 डी प्रिंटेड इमारत उभारण्यासाठी 40 ते 50 लाख युरो म्हणजेच 3.3 ते 4.2 दशलक्ष पाउंड्स खर्च येईल, असा वास्तुरचनाकार जनजीप रइजस्सेनार्स यांचा दावा आहे. 3 डी प्रिंटेड इमारत हा बांधकामाचा थेट प्रकार असून एका विशालकाय मोबियस पट्टीवर संपूर्ण इमारत उभारता येऊ शकते.
पारंपरिक बांधकामापेक्षा वेगळे कसे? : पारंपरिक बांधकाम पद्धतीमध्ये लाकडी पाट्यांची सेंट्रिंग लावून त्यात काँक्रीट भरावे लागते. 3 डी प्रिंटेड इमारतीमध्ये हे सर्व सोपस्कार करण्याची गरज नाही.

कसे होते बांधकाम? : बांधकामासाठी औद्योगिक वापराचे 3 डी प्रिंटर मार्बलसारखे बांधकाम साहित्य तयार करण्यासाठी वाळू आणि एक विशेष प्रकार घटक वापरण्यात येतो. हा घटक सिमेंटपेक्षाही किती तरी पटीने सशक्त आणि टिकाऊ असतो. मात्र, 1,000 चौरस मीटर क्षेत्रफळाची इमारत भक्कम करण्यासाठी काँक्रीट वापरावे लागते.

2014मध्ये जगातील पहिले 3 डी प्रिंटेड ‘लँडस्केप हाऊस’ वापरासाठी तयार असेल.
2.84 कोटी रुपये खर्चामध्ये एका 3 डी प्रिंटेड इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.