आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worlds Futuristic Hotel Architect Unveils Plans Sea Pearl Hotel

PICS: चीनप्रमाणे ऑस्ट्रेलियातही दिसेल तरंगणारे हॉटेल, पर्यटकांना करतील आकर्षक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रात तुम्हाला फ्यूचरिस्टिक हॉटेल दिसत आहे. सर्व नियोजनाप्रमाणे झाल्यास येणा-या काळात हे होटल ऑस्ट्रेलियाच्या गोल्‍ड कोस्टवर तरंगताना दिसेल. त्याचे डिझाइन प्रसिध्‍द वास्तूविशारद जिएनपिंग झेंग यांनी केले आहे. त्यांनी त्यास 'सी पर्ल' असे नाव दिले आहे. यापूर्वी झेंग यांनी चीनमध्‍ये अनोखे शेराटन मून हॉटेल, इन्सेक्ट हॉल( जगातील सर्वात मोठे कीटक संग्रहालय) आणि वन पर्यटन संकूल( चीनमधील पहिले खुले शॉप‍िंग मॉल) या वास्तूंचे डिझाइन केले आहे.

'सी पर्ल' ची वैशिष्‍ट्ये
या हॉटेलमध्‍ये एकूण 300 रुम्स असतील. याबरोबरच कॅसिनो, स्विमिंग पूल, प्रेझिडेन्शियल सुट पॉड्स आणि एक शॉप‍िंग राहिल. तसेच पाण्‍याखाली एक रेस्तरॉं असेल. पी पर्ल, सिडनी ओपेरा हाऊसप्रमाणे ऑस्ट्रेलियातील प्रमुख आकर्षण केंद्र राहिल, अशी आशा प्राध्‍यापक जिएनपिंग यांनी आहे. सी पर्ल पूर्ण करण्‍यासाठी 15 अब्ज रुपये खर्च येणार आहे. जिएनपिंग यांनी वास्तूची योजना ब्रिस्बेनमधील जी-20 राष्‍ट्रांच्या परिषदे दरम्यान ठेवली होती. ही योजना आतापर्यंत गोल्ड कोस्अ कौन्सिलमध्‍ये ठेवण्‍यात आलेले नाही. मात्र क्व‍िन्सलँड प्रीमियर कॅम्पबेल न्यूमॅनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, असू सूत्रांनी सांगितले.

पुढे पाहा सं‍बंधित छायाचित्रे...