आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO - जगातील सर्वात लठ्ठ पोल डान्सर; हीच्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच पडतात चाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पोल डान्स' हे नाव निघताच आपल्या डोळ्यांसमोर बारीक, नाजूक आणि आकर्षक काया असलेली तरूणी दिसते. कारण पोलच्या अवतीभवती विविध करामती करण्याकरिता डान्सरचे शरीर अत्यंत लवचिक असणे आवश्यक आहे असे सर्वांनाच वाटते. मात्र अमेरिकेच्या लूऐन ब्राउन यांनी या सर्व तर्कांना खोटे ठरवले आहे. 29 वर्षीय लुएनला जगातील सर्वात जाड पोल डान्सर म्हणून ओळखल्या जाते. विशेष म्हणजे लूएन करत असलेल्या अवघड डान्स स्टेप्सपाहून चांगल्यात चांगली पोलडान्सरसुध्दा चाट पडते.
मेरिलँडच्या हॅनोव्हर येथे राहणारी ब्राऊन म्हणते की, "जर कोणी एखादी नवीन डान्स स्टेप्स बनवली असेल तरीही मी ती अगदी सहजरित्या करू शकते." ब्राऊनच्या मित्रांच्यामते, स्प्लिट्स, नी होल्ड एवढेच नाही तर उलटे होऊन कोपर्‍याच्या साह्याने स्टेप्स करणे ही अत्यंत अवघड बाब आहे.
आपल्या या कलेविषयी बोलताना ब्राऊन म्हणातात की, "2004 मध्ये मला जेव्हा पहिली पुत्र प्राप्ती झाली, तेव्हा मला कळाले की माझे शरीर हे असेच कायम राहणार. तेव्हा मी काही तरी नवीन करण्याचा निर्णय घेतला." दोन मुलांची आई असलेल्या ब्राऊन या आपल्या अद्भूत कलेमुळे एकारात्रीत प्रसिध्द झाल्या. ब्राऊन 'अमेरिकाज गॉट टेलेंट' या टॅलेंट हन्ट शोमध्येही दिसल्या आहेत.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, ब्राऊन यांच्या अद्भूत पोलडान्स स्टेप्स...