आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात महागडे बेड 95 लाखांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमधील मॅट्रेस उत्पादक कंपनीने एका रॉयल बेडची निर्मिती केली आहे. ते जगातील सर्वात महागडे बेड ठरले आहे. त्याची किंमत सुमारे 95 लाख 10 हजार रुपये एवढी आहे. साव्होइर बेड्स या कंपनीने रॉयल बेडची निर्मिती केली आहे. चांगल्या झोपेसाठी गुंतवणूक करण्याचे आवाहनदेखील कंपनीकडून करण्यात आले आहे. केंसिंग्टन राजवाड्यातील 17 व्या आणि 18 व्या शतकातील राजघराण्याचे बिछाने आहेत. त्या बिछान्याहून प्रेरणा घेऊन हे महागडे बेड तयार करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. अशा प्रकारचे केवळ 60 बेड तयार केले आहेत. प्रत्येक बेड तयार करण्यासाठी किमान 700 तास एवढा कालावधी लागतो. कंपनीने तयार बेडशिवाय घरातील गरजेनुसार रॉयल बेडच्या निर्मिती करून देण्याची ऑफरही दिली आहे.
(छायाचित्र - संग्रहित)