आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worlds Largest Coral Reef System Great Barrier Reef

Beauty: निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्‍यायचा तर नक्की पाहा \'Great Barrier Reef\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्विन्सलँड - ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड किना-यावर 2 हजार 300 किलोमीटर पसरलेले हे आहे ग्रेट बॅरियर रीफ( पाण्‍याखाली पसरलेले विशाल खडक जिथे सागरी जीवांची विपुलता असते). येथे रीफमध्‍ये जगातील सर्वात मोठे प्रवाळ कीटकांची परिसंस्था कार्यरत आहे.यात 2 हजार 900 पर्वते आणि 940 बेटे आहेत. ग्रेट बॅरियर रीफ मरीन पार्कचे क्षेत्रफळ 3 लाख 45 हजार स्क्वेअर किलोमीटर आहे.

विविध सागरी जीवांचे घर
रीफमध्‍ये माशांची 1 हजार 500 प्रजाती, प्रवाळ कीटकांचे 411 प्रजाती आणि 134 प्रकारच्या शार्कच्या प्रजातींचे निवासस्थान आहे. यास सागरीय उद्यान असेही म्हणता येऊ शकते. या ठिकाणी सागरी कसवाच्या सात प्रजाती आणि 30 प्रकारचे सस्तन प्राणी आहेत. तसेच सागरी पक्षीही येथे पाहावयास मिळते.

जागतिक वारसामध्‍ये समावेश
ग्रेट बॅरियर रीफला युनेस्कोने 1981 मध्‍ये जागतिक वारसाचा दर्जा दिला आहे. सीएनएनने यास जगातील सात आश्‍चर्यामध्‍ये समावेश केला आहे. रीफ उद्योग म्हणजेच पर्यटन आणि मासेमारी ही दोन उद्योगांच्या माध्‍यमातून ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेत 33 हजार 177 कोटी रुपयांची प्रत्येक वर्षी भर पडत असते. तसेच 69 हजार लोकांना रोजगार मिळतो.

पुढे पाहा... ग्रेट बॅरियर रीफचे छायाचित्रे...