(चीनच्या हेनान प्रांतातील सर्वात मोठे कर मुक्त शॉपिंग मॉल)
सान्या - चीनमध्ये जगातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल खुले झाले आहे. ते पूर्ण कर मुक्त आहे. हा शॉपिंग मॉल पर्यटक आणि दुकानदारांना आकर्षित करित आहे. मॉल चीनच्या हेनान प्रांतातील सान्या शहरात बांधण्यात आले आहे.
70 हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ असलेल्या आणि तीन मजली मॉलमध्ये 300 आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्स उपलब्ध आहे. यात परफ्यूम, सौंदर्य प्रसाधने, ज्वेलरी, घड्याळ, कातडी सामान, ड्रेस मेटेरियसह इतर वस्तूंचा समावेश आहे. शॉपिंग मॉल एक सप्टेंबर रोजी सुरु झाले.
हा मॉल कर मुक्त आहे. शॉपिंग मॉलच्या उभारणीसाठी 50 अब्ज रुपयांचा खर्च आला आहे. हेनान प्रांतातील पर्यटन वाढीसाठी मॉलचा मोठा फायदा होणार आहे.
पुढे पाहा चीनमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या कर मुक्त शॉपिंग मॉलचे छायाचित्रे...