आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World\'s Largest Fourth Lake Dried, Nasa Image Depicted, Divya Marathi

PHOTOS: जगातील चौथा सर्वात मोठा तलाव आटला, नासाच्या छायाचित्रातून स्पष्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तसंस्था - कझाकिस्तान उझबेकस्तानच्या मधोमध कधी काळी जगातील सर्वांत मोठा चौथा तलाव म्हणून ओळखला जाणारा अराल समुद्र पूर्ण आटला आहे. अमेरिकी अवकाश संस्था ‘नासा’च्या टेरा उपग्रहाने नुकत्याच पाठवलेल्या एका छायाचित्रातून हे स्पष्ट झाले.

या छायाचित्राच्या आधारे काढलेल्या निष्कर्षांनुसार सुमारे ५५ लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या समुद्रात आता थेंबभरही पाणी नाही. विशेष म्हणजे १९०० च्या प्रारंभीच्या काळात या तलावात प्रचंड जलसाठा होता. १९६० च्या काळात तत्कालीन सोव्हियत संघाने पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बदलण्यासाठी सुरू केलेल्या योजनेमुळे अराल समुद्र पूर्णपणे सुकला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, आटलेल्या समुद्राची छायाचित्रे...