आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World's Laziest Countries Named In New Poll Featuring Britain ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वाधिक सुस्त देशांमध्ये ब्रिटनचा समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगातील सर्वाधिक सुस्त देशांमध्ये ब्रिटन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. ‘दी लँसेट’ या नियतकालिकाद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानंतर हा अहवाल सादर करण्यात आला आहे. ब्रिटन हा सर्वात सुस्त देशापैकी एक असून तेथील 63.3 टक्के लोकसंख्या निष्क्रिय आहे. यादीत सर्वात कमी सुस्त देशांमध्ये यूनानचे नाव आहे. यूनानची केवळ 15 टक्के लोकसंख्या निष्क्रिय आहे. या देशातील लोक सर्वात पौष्टिक अन्न सेवन करतात, असे मानले जाते.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेतील 40 टक्के लोक निष्क्रिय आहेत. सुस्त देशांच्या यादीत अमेरिका 46 व्या नंबरवर आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त सुस्त असतात, असेही सिद्ध झाले आहे. सर्वात जास्त निष्क्रिय महिला सौदी अरबसारख्या देशांमध्ये आहेत. सामाजिक बंधनांमुळे अशा देशांत महिलांना रोजगारासाठी बाहेर पडणे अशक्य असते.'