चीन आणि रशियाच्या स्वयंपाक्यांनी 112 मीटर लांबीचे कबाब तयार करून विश्वविक्रम केला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार ही स्पर्धा मंगळवारी (15 जुलै) सुरू झाली. गुरूवारी रात्री 9 वाजेपर्यंत अनेक स्वयंपाक्यांनी विविध पदार्थ तयार केले. या स्पर्धेचे आयोजन चीन-रशियाच्या सीमेवरील भागातील सुईफेहे या शहरात करण्यात आले होते.
जागतिक रेकॉर्ड करणा-या स्वयंपाक्यांनी मटण शिजवण्यासाठी 111 मिटर लांब लोखंडी अँगलचा वापर केला. मटणापासून तयार करण्यात आलेल्या कबाबची लांबी 112.374 मीटर होती. या कबाबमुळे या आगोदरच्या 107.6 मीटर लांब कबाबचा रेकॉर्ड मोडला आहे. या स्पर्धेचे आयोजन टूरीझम फेस्टिव्हलमध्ये करण्यात आले होते.
पुढील स्लाईडवर पाहा सर्वात लांब कबाबची छायाचित्रे...