लंडन- बर्गर चाहत्यांसाठी लंडनमधील चेल्सिया रेस्तरॉं 'हॉन्की टोंक'ने खास हॅमबर्गर तयार केला आहे. परंतु, याची चव चाखणे सर्वांना परवडण्यासारखे नाही. सुवर्ण पानांनी मढवलेल्या या हॅमबर्गरची किंमत मालदिवला जाण्यासाठी लागणाऱ्या एखाद्या लग्झरी हॉलिडेएवढी आहे. याची किंमत 1,1237.50 पाउंड म्हणजेच 1.20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या बर्गरला क्रिस लार्ज नावाच्या शेफने तयार केले आहे.
या हॅमबर्गरला बनवण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा कालावधी लागला. बर्गरची पॅटी तयार करण्यासाठी 220 ग्रॅंम कोब वॅग्यू बीफ किमा, फॅट बॅलेंस करण्यासाठी 60 ग्रॅम न्युझिलंडच्या हरिणाचे मटण आणि ग्रेव्हीसाठी ब्लॅक ट्रफल (मशरुम) यांचा वापर करण्यात आला. पॅटी तयार केल्यानंतर त्याला हिमालयन सॉल्टसोबत गरम इराणी केशरच्या कनाडाई लॉब्सटरसोबत सर्व्ह केले जाते.
बर्गरला गार्निश करण्यासाठी खुप प्रयत्न करण्यात आले आहेत. जगातील सर्वांत महागडे बर्गर म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. याला बनवण्यासाठी मीठ, मेयोनाइजसह 14 प्रकारची सामग्री वापरण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रेस्तरॉंच्या मालकाने एक कॉम्पिटिशन सुरू केली असून त्यात जिंकणाऱ्या व्यक्तीला जगातील सर्वांत महागडे बर्गर निःशुल्क खाण्यास मिळणार आहे.
या बर्गरचे फोटो बघा, पुढील स्लाईडवर...