आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worlds Most Luxurious Cruise Ship With Biggest Suite

जगातील सर्वात आरामदायी जहाज, एका सूटसाठी मोजावे लागणार 40 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: रीजेंटचे सेव्हन सीज एक्सप्लोरर जहाज
जेनोआ- रिजेंट सेव्हन सीज जगातील सर्वात मोठे शिप सुट प्रवाशांसाठी आणत आहे. तो आकाराने 3 हजार 875 स्क्वेअर फुटच्या एका टाऊनहाऊसबरोबरच असेल. यास रिजेंट सूट असे नाव देण्‍यात आले आहे. पुढील वर्षी सेव्हन सीज एक्सप्लोरर जहाजमध्‍ये लॉन्च केले जाणार आहे. जहाजात प्रवासासाठी 4 फेब्रुवारीपासून आरक्षणाची सुविधा सुरु केली जाणार आहे. सेव्हन सीज एक्सप्लोरर 14 दिवस आपल्या प्रवाशांना मॉन्टे कार्लो ते व्हेनिसपर्यंत प्रवास घडवून आणणार आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ति‍ला 40 लाख रुपये मोजावी लागणार आहे.

स्पा ट्रीटमेंटची सुविधा
जहाजमध्‍ये प्रवाशांसाठी स्पा ट्रीटमेंटची सुविधाही उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त डिलक्स सूट आणि पेंटहाऊसची उत्कृष्‍ट पर्याय राहिल. किंमतीचा विचार केल्यास ते स्वस्त आहे.
750 प्रवाशी करु शकतात प्रवास
सेव्हन सीज एक्सप्लोररचे वजन 56 हजार टन असेल आणि त्यात 750 लोक प्रवास करु शकतील. रिजेंटला जगातील सर्वात आरामदायी प्रवाशी जहाज तयार केले जाणार आहे. जुलै 2014 पासून इटलीच्या जेनोआ येथे जहाजचे बांधकाम चालू आहे. पुढील वर्षी रिजेंट सेव्हन सीज क्रूजेससह सहभागी होईल.

पुढे पाहा, सेव्हन सीज एक्सप्लोररचे अंतरंग...