आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंतांचे आलिशान बिझनेस जेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या जगभरातील श्रीमंतांचे लक्ष गल्फ स्ट्रीमच्या नवीन जी-650 बिझनेस जेटवर आहे. 2008 मध्ये गल्फ स्ट्रीमने विमानांची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आणि कंपनीच्या बॅँक खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले. 65 कोटी डॉलर किमतीच्या या विमानाची बुकिंग आज केल्यानंतर याची डिलिव्हरी 2017 मध्ये केली जाईल.

गल्फ स्ट्रीमचे अध्यक्ष लॅरी फ्लिन सांगतात, कदाचित यापूर्वी कुणालाही इतक्या उच्च दर्जाच्या समस्येला तोंड द्यावे लागले नसेल. गल्फ स्ट्रीम कंपनी टॅँक, पाणबुडी आणि इतर लष्करी सामान बनवणार्‍या जनरल डायनॅमिक्सचा सर्वोत्तम विभाग आहे. 2011 मध्ये त्याची विक्री 236 अब्ज रुपये होती. विमानाची नोंदणी करणार्‍यांनी आपला नंबर इतरांना विकण्यावर गल्फ स्ट्रीमने बंदी घातली आहे. असे यापूर्वी घडले नव्हते. आखाती देशांचे शेख, रशिया, चीन आणि इतर देशांतील श्रीमंत हे विमान मिळवण्यासाठी आतूर आहेत. विमानाची निर्मिती करण्यासाठी गल्फ स्ट्रीमनाचे ग्राहक, वैमानिक, ब्रोकर आणि मेंटेनन्स कर्मचार्‍यांकडून सूचना मागवल्या होत्या. अभियंत्यांना 7 हजार ते दहा हजर नॉटिकल किलो मीटरच्या मार्गाला ध्यानात घेत डिझाइन बनवण्यास सांगण्यात आले. लॉसेंजेलिस ते लंडन आणि शांघाई ते न्यूयॉर्कसारख्या उडाणांप्रसंगी यामुळे एक ते दोन तासांची वेळेची बचत होईल.

थ्रीडी अभियांत्रिकीच्या वापरामुळे विमानाला वेगवान बनवण्यासोबतच यात प्रवाशांना आराम मिळावा आणि त्यांच्या सुविधांचीही काळजी घेण्यात आली आहे. खिडक्या, पडदे आणि इतर यंत्रणांना स्मार्ट फोनच्या माध्यमातूनही नियंत्रित केले जाऊ शकेल. एव्हिएशन ब्रोकर कंपनी एवजेटचे उपाध्यक्ष अ‍ॅण्ड्रू ब्रेडले सांगतात, जी-650, विमानचालन उद्योगात नवीन पहाट उजडल्याप्रमाणे आहे. सादरीकरण, आरामसह इतर सुविधांमध्ये इतरांपेक्षा हे विमान अग्रेसर आहे. ब्रेडलेंच्या कंपनीने 11 विमानांची ऑर्डर दिली आहे.