आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जगातील सर्वात छोटे थिएटर भारतात दाखल, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तम कलाकार त्‍याच्‍या कलेमधून रंगभूमीचं कार्य पुढे नेण्‍यासाठी प्रयत्‍न करत असतो. त्‍यासाठी त्‍याला प्रत्‍येकवळी जसवलेल्‍या रंगमंचाची गरज असतेच असे नाही. संधी मिळेल तिथे तो त्‍याची कला दाखवण्‍याचा प्रयत्‍न कतर असतो. प्रेक्षकाला आनंद मिळवून देत असतो. आज आम्‍ही तुम्‍हाला मनोरंजन करणा-या जगातील सर्वात छोट्या रंगमंचाची (थिएटरची) माहिती देणार आहोत.
जगभरातील लोकांना मनोरंजनातून आनंद मिळवून देण्‍याचे कार्य करणा-या 'द ग्रांड थिएटर ऑफ लेमिंग्स' थिएटर कंपनीचे कलाकार तुमच्‍या मनोरंजनासाठी भारतात दाखल झाले आहेत. हे थिएटर चालवण्‍यासाठी कलेची आवड असलेल्‍या अनाथ अश्रामातील मुलांना सोबत घेऊन देशभर विविध कार्यक्रम करणार असल्‍याची माहिती कंपनीचे सदस्‍य मँडी मेडलीकॉटने दिली.
महिनाभर भारतात होणार प्रयोग-
लंडनमधील एसेक्‍स प्रांतातील 'द ग्रांड थिएटर ऑफ लेमिंग्स' चे कलाकार महिनाभर भारतीयांचे मनोरंजन करणार आहेत. भारतात महिनाभर प्रयोग करण्‍यासाठी थिएटर कंपनीच्‍या कलाकारांनी 5 लाख रूपये फंड एकत्र केला आहे. या छोट्या थेअटरसाठी एक मोटारसायकल आणि साईड कारचा वापर करण्‍यात आला आहे.
थेएटरचा इतिहास-
-कलाकार मार्श स्टिनरने 1971 मध्‍ये या थिअरटची सुरूवात केली.
-1980 थिएटर आगीत खाक झाले.
- 1999 मध्‍ये मार्शल स्टिनरच्‍या मृत्‍यूनंतर काही काळासाठी हे थिएटर बंद पडले.
- 'द ग्रांड थिएटर ऑफ लेमिंग्स'ने जगातील सर्वात छोट्या थिएटरची खरेदी केली आणि जगभर प्रयोग करायला सुरूवात केली.
- फक्‍त दोघेजन मावतील एवढ्या छोट्या थेयटरमध्‍ये बॉक्‍स ऑफिस आणि ऑडिटोरियमची पाहायला मिळते.

पुढील स्‍लाईडवर पाहा जगातील सर्वात छोट्या थिएटरची फोटो...