आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाझावरील इस्रायलच्या हल्लाबाबत जगभरातून विरोध, लाखो लोक उतरले रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसमध्ये गाजावर इस्रायल हल्ल्या विरोधात निदर्शन करताना लोक
गाझा- गेल्या 18 दिवसांपासून इस्रायल-गाझा संघर्षाने भीषण रुप धारण केले आहे. काल (24 जुलै) संयुक्त राष्ट्राव्दारे गाझा पट्टीमध्ये चालवण्यात येणारी एक शाळावर इस्रायलने रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात पॅलेस्टाइनांचा मृत्यू झाला असून 200पेक्षा जास्त जण गंभीर जखमी आहेत. दोन्हीकडून भीषण संघर्षामध्ये आतापर्यंत 800पेक्षा जास्त पॅलेस्टाइनी आणि 35 इस्रायल नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्राने इस्रायल कारवाईची मागणी केली आहे. जगभरातील लोक गाझाच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
गाझाच्या समर्थनासाठी जवळपास 10,000 निदर्शनकारांनी रामल्लाहपासून ते पूर्व येरुशलमकडे मोर्चा काढण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अमेरिका, कॅनाडा, यूरोप आणि जगातील अनेक देशांमध्ये इस्रायल हल्ल्याचा विरोध करण्यात येत आले.
अमेरिकेत कुठे-कुठे होत आहे विरोध
वाशिंगटन, पिट्सबर्ग, सैन फ्रान्सिस्को, ऑकलँड, डेनवर, इंडियानापोलिस, न्यू हॅमशायर, फिलाडेल्फिया, मिनियापोलिस, बोस्टन, डेट्रॉयट, शिकागो, न्यू ऑर्लिएंस
कॅनाडामध्येसुध्दा विरोध
कॅनाडाच्या ओटावा, मोंटरिअल, कॅल्गेरी, विनीपेग आणि वँकुवरमध्येसुध्दा इस्रायल हल्ल्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत.
अरबमध्येही निदर्शने
अम्मान (जॉर्डन), बेरुत (लेबनान), रबत (मोरक्को) आणि ट्यूनिश (ट्यूनिशिया)मध्येसुध्दा आज (25 जुलै) जोरदार निदर्शने सुरु असून लोक रस्त्यावर उतरले आहेत.
याशिवाय दक्षिण अफ्रिकेच्या डरबन आणि केपटाऊनमध्येसुध्दा हल्ल्याचा विरोध दिसून आला. जर्काता, बीजिंग, सिओल आणि जपान, दिल्ली आणि मुंबईमध्येही निदर्शने झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इस्रायल हल्ल्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी आणि निदर्शनाची छायाचित्रे...