आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्को-द-गामाची सफर ठरली जागतिक वारसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - पंधराव्या शतकातील वास्को-द-गामाच्या भारत सफरीचे दस्तऐवज जागतिक वारशात समाविष्ट करण्यात आले आहेत. या सफरीचे वर्णन गामा यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने स्वहस्ताक्षरात लिहिले आहे. संयुक्त राष्‍ट्रसंघाने या दस्तऐवजांना जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे. ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये या दस्तऐवजांना स्थान मिळाले. या सफरीदरम्यान झालेले अपघात तसेच यशाचे जिवंत चित्र या दस्तऐवजात करण्यात आले आहे. 1992 मध्ये या ‘रजिस्टर’ची स्थापना करण्यात आली होती. यात आतापर्यंत 299 दस्तऐवज आणि संग्रहांचा समावेश करण्यात आला आहे.