आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेवर लिहून पाठवा मेसेज, ई-मेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - हाताने हवेत लिहिता आले तर... ही काही आता केवळ कविकल्पना राहिलेली नाही. संशोधकांनी विशिष्ट प्रणालीच्या साह्याने हवेत लिहिण्याचे तंत्र विकसित केले असून हवेत लिहिलेला मेसेज किंवा ई-मेल पाठवणेदेखील सहज शक्य होणार आहे. मेसेज पाठवण्याच्या प्रणालीसाठी विशिष्ट ग्लोव्ह तयार करण्यात आले आहेत. त्याच्या साह्याने संदेशांची देवाणघेवाण करणे शक्य होणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. जर्मनीच्या कार्लश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ग्लोव्ह तयार केले आहे. हातांच्या हालचालींचा अभ्यास करणारी व्यवस्था या यंत्रणेत पाहायला मिळते. इन्स्टिट्यूटचे ख्रिस्तोप अ‍ॅम्मा यांनी हे तंत्र विकसित केले आहे. ग्लोव्ह दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी फारसे सोयीचे ठरत नाहीत. त्यामुळे त्याची जागा मनगटावरील बँड घेईल, असा विचारही सुरू आहे.