इंटरनॅशनल डेस्क - दुस-या महायुध्दाच्या दरम्यान वापरण्यात आलेली युध्द विमानांना गंज चढलेला आहे. अमेरिकेतील ओहिओ राज्यातील एका घराच्या मागे भग्नावस्थेत ती पडून आहेत, असे मीडिया रिपोर्टमध्ये पुढे आले आहे. वॉल्टर सोप्लाटा नावाच्या स्क्रॅपयार्ड वर्करने महायुध्दातील विमानांचे कलेक्शन केले होते, असे सांगितले जाते. युध्दानंतर जवळ-जवळ एका दशकानंतर न्यूबरीचा सोप्लाट यांनी विमाने जमा केली होती.
2010मध्ये त्याचे निधन झाले. यानंतर त्याच्या नातेवाइकांनी ते विमाने अज्ञातस्थळी ठेवली होती. भंगार जमा करणारे ते नेतील अशी त्यांना भीती होती. देखरेखीच्या अभावामुळे जागतिक महायुध्दाची पार्श्वभूमी असलेल्या विमानांचे भंगारात रूपांतर झाले. मी एका मोकळ्या इमारतीचा शोध घेत असताना, माझी नजर विमाने असलेल्या त्या ठिकाणावर पडली. ते पाहुन माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. मग मी माझ्या कॅमे-यात त्यांची छायाचित्रे कैद केली, असे छायाचित्रकार जॉनी यांनी सांगितले.
सोप्लाटाच्या घरामागे 50 इंजिन्स आणि 30 एअरक्राफ्टस होते. विमाने असलेले हे स्थळ इतिहासाच्या पाऊल खुणांची एक आऊटडोर म्युझियम आहे, असे तो म्हणतो. ही आतापर्यंतच्या सर्वात सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे जिथे मी फोटोग्राफी केली आहे, असे शब्दात जॉनीने आपला आनंद व्यक्त केला.
पुढील छायाचित्रांमध्ये पाहा भंगारात रूपांतर झालेल्या विमानांचे कलेक्शन .....