आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xi Jinping Narendra Modi News In Marathi , India China Relation, Divya Marathi

मोदींनी मुद्दा मांडताच जिनपिंग म्हणाले, सीमेच्या हद्दी ठरेपर्यंत वाद होणारच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा दोन दिवसीय भारत दौरा दोन्ही देशांदरम्यान मैत्रीचे नवे पर्व निर्माण करणारा ठरला. मात्र, याचदरम्यान सीमेवर चिनी सैनिकांनी चालवलेल्या घुसखोरीचा मुद्दा दुर्लक्षितच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर बैठकीत हा मुद्दा मांडून चीनला भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडले. मोदींनी मुद्दा मांडताच जिनपिंग म्हणाले, ‘जोवर दोन्ही देशांतील ताबा रेषा ठरत नाही तोवर असे वाद होतच राहतील.’ जिनपिंग यांनी मोदींना पुढील वर्षी चीन भेटीवर येण्याचे निमंत्रणही दिले.

लडाख भागात चुमारमध्ये सध्या दोन्ही देशांचे ५००-५०० सैिनक तळ ठोकून बसले आहेत. या दोघांत जास्तीत जास्त २०० मीटरचे अंतर आहे.दरम्यान, गुरुवारी दिल्लीत मोदी-जिनपिंग यांच्यात करारावर स्वाक्ष-या करण्यासाठी धामधूम सुरू असताना तिकडे चिनी जवान भारतीय हद्दीत पाच किमी आत घुसले होते. दरम्यान, कैलास मानसराेवर यात्रेसाठी पर्यायी रस्ता तयार करून देण्यास चीन राजी झाला अाहे.

तणाव चेह-यावरही
एकीकडे दोन्ही देशांत मोठमोठे करार होत असताना शिखर परिषदेत सीमेवरील तणावाचा विषय उपस्थित झाल्यानंतर याचा तणाव दोन्ही नेत्यांच्या चेह-यावरही स्पष्ट दिसत होता. यादरम्यान चिनी गुंतवणुकीची आिण दोन्ही देशांतील १२ करारांची माहिती जाहीर करण्यात आल्यावर तणाव काहीसा ओसरला.

समजूतदारपणा
शिखर बैठकीत सीमावाद उपस्थित झाल्यावर प्रत्यक्ष ताबा रेषा निश्चित करून वाद सोडवला जावा, अशी भूिमका िचनी राष्ट्राध्यक्षांनी मांडली. या सीमाच अजून निश्चित नाहीत. यावर लवकर चर्चा घडून यावी.

* दोन्ही देशांत झालेल्या करारांत रस्ते मार्गापासून अवकाश क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रांत करार करण्यात आले आहेत. याशिवाय भारतात १२०० अब्ज रुपयांची गुंतवणूक विकासाला चालना देणारी ठरू शकते. याचा विशेष लाभ म्हणजे दोन्ही देशांत या निमित्ताने कायमस्वरूपी मैत्रीपर्व सुरू होणार आहे.
* भारत-चीनचा जगभरात दबदबा आहे. हे दोन्ही देश जेव्हा काही मत मांडतात तेव्हा जगाचे कान या देशांकडे असतात. : जिनपिंग
*... म्हणूनच दोन्ही देश या निमित्ताने द्विपक्षीय संबंधांत मैत्रीचे नवे पर्व सुरू करू शकतील. हा एक शुभसंकेतच मानायला हवा. : नरेंद्र मोदी

ड्रॅगनशी झालेले बारा करार
1. पाच वर्षांसाठी आिर्थक करार.
2. औषधनिर्मिती क्षेत्रात सहकार्य.
3. भारतात रेल्वेच्या विकासासाठी चीनची मदत
4. गोवा चित्रपट महोत्सवात चीन सहभागी होणार.
5. आयात शुल्काबाबतचे नियम दोन्ही देश शिथील करणार.
6. सांस्कृतिक सहकार्य, दोन्ही देशांचे १५०० शिक्षक परस्पर देशांचे दौरे करणार.
7. मुंबईचे शांघाय करण्यासाठी गुंतवणूक करार.
8. द्रकश्राव्य माध्यम क्षेत्राच्या िवकासासाठी मदत.
9. गुजरात व महाराष्ट्रात दोन औद्योगिक पार्क उभारणार.
10. अवकाश क्षेत्रात सहकार्य.
11. २०१५ चीनमध्ये "भारत प्रवास वर्ष'
12. २०१६ मध्ये भारतात "चीन प्रवास वर्ष'