आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Xi Jinping Sumitra Mahajan News In Marathi, Chinese President, Lok Sabh Speaker, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी घेतली सुमित्रा महाजन यांची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ इंदूर - भारत दौ-यावर असलेले चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शुक्रवारी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे ४० मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी सुमित्रा महाजन यांनी जिनपिंग यांना महेश्वरमध्ये तयार झालेली शाल भेट दिली. ही भेट आवडल्याचे सांगत जिनपिंग यांनी समाधान व्यक्त केले.

महाजन यांनी महेश्वर व अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी जिनपिंग यांना माहिती दिली. अहिल्यादेवी होळकर यांची नगरी असलेल्या महेश्वर येथे तयार होणारे प्रसिद्ध वस्त्र व त्याची वैशिष्ट्ये महाजन यांनी जिनपिंग यांना सांगितली. ही शॉल आपल्या पत्नीसाठी भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर जिनपिंग ही भेट स्वीकारताना येथील वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा विचार दोन्ही नेत्यांनी बोलून दाखवला. आर्थिक व औद्योगिक प्रगतीसोबतच मानवी मूल्य, संस्कृती, विकास या क्षेत्रांतही दोन्ही देशांना परस्पर सहकार्य करता येईल. त्याचबरोबर सांस्कृतिक आदान-प्रदान व महिला सशक्तीकरणावर भर देण्याची सू़चना सुमित्रा महाजन यांनी केली. आधुनिक काळातील पहिले पुस्तक चीनमध्ये छापले गेले होते व ते गौतम बुद्धांशी संबंधित होते, अशी माहितीदेखील महाजन यांनी जिनपिंग यांना दिली. ही अनोखी माहिती ऐकून जिनपिंग हे आश्चर्यचकित झाले. भेटीच्या समारोपप्रसंगी जिनपिंग यांनी महाजन यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले.