आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याहू-फेसबूक येणार एकत्र, पेटंटचा वाद मिटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- याहू आणि फेसबूक यांच्‍या पेटंटवरुन सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. दोन्‍ही कंपन्‍यांनी हा वाद मिटविण्‍याचा निर्णय घेतला असून लवरकच एकत्र येणार आहेत. यासाठी त्यांनी पेटंटसंबंधी एक करार करण्याचा निर्णय घेतलाय.
याहूने मार्च महिन्यात फेसबूकविरुद्ध खटला दाखल केला होता. आपल्या १० ‘पेटंटस्’चं उल्लंघन केल्याचा आरोप याहूने फेसबूकवर केला होता. तर या विरोधात फेसबूकने एप्रिल महिन्यात याहूविरुद्ध खटला दाखल केला होता. हा वाद आता मिटला आहे. दोन्‍ही कंपन्‍या एकत्र येऊन नवी भागीदारी सुरु करणार आहेत. याहुवरील बातम्‍या व इतर माध्‍यमांशी संबंधित माहिती आता फेसबुकवर उपलब्‍ध होईल.
दोन्ही कंपन्यांच्या जाहिरातीकरणही एकत्रितरित्या होणार आहे. तसेच दोन्ही कंपन्यांच्या काही महत्त्वपूर्ण पेटंटसाठी एकमेकांना निवडक अधिकार दिले जातील.
याहू आणि फेसबूक दोघांच्याही सदस्यांकडून या करारासाठी मंजुरी मिळालीय. पण, याची अधिकृत घोषणा मात्र शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.
फेसबुकला हवाय तुमचा मोबाइल नंबर
नवे माध्यम : नवोदित साहित्यिकांना फेसबुकचा आधार
एकाच वेळी जी-मेल आणि फेसबुकचा वापर