आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थापकानेच याहू सोडले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क । जगविख्यात इंटरनेट कंपनी याहूचे सहसंस्थापक जेरी यँग यांनी कंपनीला सोडचिठ्ठी दिली आहे. यँग यांनी कंपनीच्या संचालक मंडळाबरोबरच इतर पदांचाही राजीनामा दिला आहे.
याहू जपान कॉर्पोरेशन,अलीबाबा ग्रुप होल्डिंग आदी कंपन्यांच्या संचालक मंडळाचाही यँग यांनी राजीनामा दिला आहे. याहू कंपनीत या दोन्ही कंपन्यांची हिस्सेदारी आहे. ई-बे या कंपनीचे माजी अधिकारी स्कॉट थॉमसन यांना याहूच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त केल्यानंतर लगेच यँग यांनी सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सन 1995 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील आपले सहकारी डेव्हिड फिलो यांच्या साथीने यँग यांनी याहू कंपनीची स्थापना केली होती. त्यावेळी याहूचे चीफ म्हणून त्यांचे पद होते.मार्च 1995 ते आतापर्यंत ते याहूच्या संचालक मंडळाचे संचालक होते.तसेच सन 2007 ते 09 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही यँग यांनी कारभार पाहिला होता.याहू कंपनीत यँग यांची आता 3.8 टक्के हिस्सेदारी आहे.