आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येमेनमध्ये बंडखोरांचा हल्ला, ३४० जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सन्ना - येमेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिया-सुन्नी संघर्ष पेटला आहे. सोमवारी शिया बंडखोर गटाने सत्ताधारी सुन्नी लष्कराच्या तळावर चढाई केली. त्याचबरोबर सुन्नी समुदायाची घरे तसेच सरकारी इमारतीही ताब्यात घेतल्या. हिंसाचारात ३४० जणांना आपले प्राण गमवावे लागले.

येमेनच्या राजधानीत सोमवारी भयंकर हिंसाचार पाहायला िमळाला. हवाथी सशस्त्र गटाने अनेक लष्करी तोफा ताब्यात घेतल्या. त्याचबरोबर लष्करी मुख्यालयातून अनेक तोफा पळवण्यातही आल्या. त्याचबरोबर बंडखोरांनी काही घरांवरदेखील सशस्त्र हल्ले चढवले. त्यात लष्करी अधिका-यांचा समावेश होता. त्याचबरोबर सुन्नी कट्टरवादी गटप्रमुखाच्या घरावरही बंडखोरांनी ताबा मिळवला.

अगोदर संयुक्त राष्ट्राने हवाथी आणि त्यांच्या शत्रू गटामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. संयुक्त राष्ट्राकडून त्यांचे प्रतिनिधी म्हणून जमाल बेनोमर यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती. िहंसाचारातील मृतांची संख्या ३४० वर पोहोचली आहे.