आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yemen National Beheaded In Saudi For Killing A Pakistani National

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्‍तानी नागरिकाची हत्‍या करणा-याचा सौदी अरबमध्‍ये शिरच्‍छेद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौदी अरबमध्‍ये गुरुवारी बलात्‍कार आणि हत्‍याप्रकरणातील दोषीचा भर चौकात शिरच्‍छेद करण्‍यात आला. त्‍याचे धडावेगळे शिर लटकावून देण्‍यात आले. मोहम्‍मद रशद हुसेन असे या व्‍यक्तीचे नाव आहे. तो मुळचा येमेनचा रहिवासी होता. एका पाकिस्‍तानी नागरिकाची हत्‍या केल्‍याचा आणि त्‍याच्‍या मृतदेहासोबत अनैसर्गिक संभोग केल्‍याचा आरोप होता. याप्रकरणी त्‍याला दोषी ठरविण्‍यात आले. इस्‍लामी कायद्यानुसार निशिद्ध कृत्‍य केल्‍यामुळे त्‍याला मृत्‍यूदंडाची शिक्षा ठोठाविण्‍यात आली.

हुसेनवर दरोडे आणि इतरही अनेक गुन्‍हे दाखल होते. यावर्षी सौदी अरबमध्‍ये आतापर्यंत 28 जणांचा शिरच्‍छेद करण्‍यात आला आहे. बलात्‍कार, हत्‍या, सशस्‍त्र दरोडा तसे अंमली पदार्थांच्‍या तस्‍करीप्रकरणी सौदीमध्‍ये भर चौका‍त शिरच्‍छेद करण्‍यात येतो. गेल्‍या वर्षी 76 जणांचा शिरच्‍छेद करण्‍यात आला होता.