आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये सुरक्षित प्रसूतीसाठी गर्भवतींचा योगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगसा- चीनमधील हुनान प्रांतात गर्भवती महिलांसाठी सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 505 गर्भवतींनी योगाचे धडे गिरवले. गर्भवती महिलांचा योगा शिबिरातील सहभागाचा हा विश्वविक्रम ठरला. सुरक्षित व नैसर्गिक प्रसूतीसाठी मार्गदर्शन करणे हा या योग शिबिराचा उद्देश होता.

चीनच्या रुग्णालयांमध्ये योगा वेगाने लोकप्रिय होत आहे. याआधी गत वर्षी ग्वांगडाँग प्रांतात सेनझेनमध्ये अशाच प्रकारचे शिबिर झाले होते. त्याचा विक्रम (423) या वेळी मोडीत निघाला.

विश्वविक्रम प्रस्थापित
>2013 मध्ये चीनमध्येच झालेला विक्रम मोडीत
>37 मिनिटे 28 सेकंदांपर्यंत योगा.