आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yogasan Tax In America Organisation News In Divya Marathi

अमेरिकेत संस्थांमधील योगासनांवर लावला कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये १ ऑक्टोबरपासून जिम फिटनेस सेंटर तसेच अन्य व्यायामांच्या ठिकाणांवर ५.७ टक्के विक्री कर लावण्यात आला आहे. याला ‘योग टॅक्स’ असे म्हटले जात आहे.

सिटी कौन्सिलने कायद्यात ‘योग’ शब्दाचा उल्लेखही केला नाही. डान्स व योगासने करणाऱ्या स्थानिकांच्या मते, त्यांच्यासाठी हा कर लागू नाही. योगा अलायन्स संस्थेचे अध्यक्ष रिचर्च कोर्पेल म्हणतात, आमच्याकडे नृत्य किंवा चीनमधील ताई,चेई कलेप्रमाणेच योगा केला जातो. जिममध्ये योगा करणाऱ्या बहुतांश लोकांना बौद्ध किंवा हिंदू अध्यात्माविषयी फार आस्था नसते. योग स्टुडियो चालवणाऱ्या लोकांचा उद्देश बुद्धी, शरीर व मन एकाग्र करणे असतो. २०१३ मध्ये एका निकालानुसार योगासनांचे मूळ एखाद्या धर्मात असले, तरी याचा परिणाम योगासने शिकवणाऱ्या चर्चवर होत नाही.