आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूममध्ये झोपलेला तरुण धरणीच्या पोटात गडप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेफनर (फ्लोरिडा )- घरातील जमीन अचानक खचल्याने बेडरूममध्ये झोपलेला एका तरुण धरतीच्या पोटात अक्षरश: गडप झाला. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात ही घटना घडली. गेल्या तीन दिवसांपासून या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता अखेर शनिवारी ही शोधमोहीम बंद करण्यात आली. आता चार बेडरूमचे हे घर पाडण्यास सुरुवात झाली आहे.
फ्लोरिडा राज्यातील तांपा शहरानजीकच्या सेफनर या गावात गुरुवारी रात्री ही घटना घडली.धरतीच्या उदरात गडप झालेल्या या तरुणाचे नाव जेफ बुश असून तो 37 वर्षांचा होता. विशेष म्हणजे त्याच्या कुटूंबातील पाच जण सुखरुप असून बेडरुममधील इतर वस्तूंनाही धक्का लागलेला नाही.शनिवारी बुश कुटूंबियांना सामान काढण्यासाठी अर्धा तास घरात जाण्याची परवानगी देण्यात आली. तरुण गडप झाल्याची बातमी देशभरात पसरल्यानंतर शनिवारी 8 हजार लोकवस्तीच्या छोटयाशा गावात कारची रांग लागली होती. इंजिनियर्स, पत्रकार, कॅमेरामन आणि बघ्यांनी एकच गर्दी केली.

चार बेडरूमचे घर पाडण्यास सुरुवात

शेजार्‍यांची झोप उडाली
शेजार्‍यांची या घटनेनंतर झोप उडाली आहे. गोंझालेझ भगिनी सॉलिरीस आणि एल्बेरिस चांगल्याच धास्तावल्या आहेत. दोन दिवसांपासून तर स्वप्नातही घराला कुठे तडे तर गेले नाहीत याचीच चाचपणी करताना मी दिसते, अशा शब्दात सॉलिरीस हिने भीती बोलून दाखवली.

खड्ड्याचे तोंड वीस फूट
घराच्या बेडरूममधोमध वीस फूट व्यासाचा हा खड्डा आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन दिवस त्याची खड्ड्यात पाहणी केली, पण त्यांनाही आता घर कोसळण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे घर भुईसपाट करण्यात येणार आहे. शेजारील घरेही रिकामे करण्यात आले.