आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Mother Burned Alive After Being Accused Of Witchcraft

हजारो लोकांसमोर महिलेस जीवंत जाळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट मोर्सबी (पापुआ न्यू गिनी) - महिलेला चेटकीण समजून तिला हजारो लोकांच्या समोर जीवंत जाळण्यात आल्याची अमानुष घटना पापुआ न्यू गिनी या देशात शुक्रवारी घडली. जादूटोण्यातून झालेली ही हत्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दक्षिण प्रशांत महासागरातील बेटावरील देशातील या घटनेने संपूर्ण प्रदेश हादरून गेला आहे.

केपारी लेनीअ‍ॅटा (20) असे या दुर्देवी महिलेचे नाव आहे. केपारी चेटकीण असल्याचा संशय होता. त्यामुळे तिला बुधवारी लोकांनी नग्न करून प्रचंड शारीरिक यातना दिल्या. त्यानंतर तिला कार टायरच्या मदतीने जाळून टाकण्यात आले. त्यावेळी सुमारे पाच हजार नागरिक होते. तिला जाळण्यात आल्याचे छायाचित्र देशातील आघाडीच्या वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर जगासमोर ही धक्कादायक बाब समोर आली. गुरूवारी तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पंतप्रधान पेट ओनील यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.