आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या मुलाच्या अस्थीचे केले हिर्‍यामध्ये रूपांतर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - लाडक्या मुलाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी इटलीतील एका पित्याने त्याच्या अस्थीचे रूपांतर हिर्‍यामध्ये करून घेतले. या दुर्दैवी पित्याने आपला वीस वर्षांचा मुलगा गमावला.
मुलावर अग्निसंस्कार केल्यानंतर त्याच्या अस्थी स्वित्झर्लंडला पाठवण्यात आल्या. तेथे त्याचे रूपांतर हिर्‍यांमध्ये करण्यात आले. याच वर्षी इटलीतील ट्रेव्हिसो शहरात झालेल्या कार अपघातात 55 वर्षीय व्यक्तीचा मुलगा मृत्युमुखी पडला होता. त्याचा सुरुवातीला दफनविधी झाला होता; परंतु पित्याला मुलाच्या आठवणींनी अस्वस्थ केले. त्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली. मग पुन्हा मुलाच्या पार्थिवाचे दहन करून त्याच्या अस्थींपासून मौल्यवान रत्न तयार करण्यात आला. संयोग क्रिया घडवून त्यापासून रत्न तयार झाला आहे. त्यासाठी त्यांना सुमारे 11 लाख 13 हजार रुपये एवढा खर्च आला.