आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Youth Turn To Politics Through Facebook, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुकमुळे तरुणांचा राजकारणाकडे कल वाढले, एका पाहणीतून स्पष्‍ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - तरुण राजकारणाकडे वळत नाहीत असे म्हटले जाते. जगभरात हेच असल्याचा समज होता, परंतु आता हे चित्र पालटू लागले आहे. फेसबुकमुळे तरुणांचा राजकारणाकडे कल वाढल्याचे एका पाहणीतून दिसून आले आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेत करण्यात आलेल्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

राजकारणाकडे तरुणांचा कल तुलनेने पूर्वीपेक्षा वाढला आहे. त्यामागे सोशल मीडियाचे साधन पूरक ठरले आहे. राजकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा ठेवणारे तरुण फेसबुकचा वापर करतात, असे पाहणीत दिसून आले. पाहणीत ऑस्ट्रेलियातील ६५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी फेसबुकच्या मदतीने राजकीय घडामोडी जाणून घेत असल्याचे सांगितले. राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय टीव्ही कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रमांची माहिती पहिल्यांदा फेसबुकवर मिळाल्याने त्यांना या साधनाचा फायदा झाला.