आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या दबावामुळे पाकिस्तानच्या न्यायालयाने वाढवला लखवीचा तुरुंगवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारताकडून होणार्‍या दबावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी झकीउर-रेहमान-लखवी याच्या तुरुंगवासात आणखी एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 डिसेंबरला होणार आहे.
एका नव्या आदेशामध्ये पाकिस्तानच्या कोर्टाने झकीउर रेहमान लखवीच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यास मनाई केली आहे. तसेच त्याच्या शिक्षेमध्ये आणखी दहा दिवसांची वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लखवी सध्या पाकिस्तानच्या अदियाला तुरुंगात कैदेत आहे. लखवीच्या तुरुंगवासाचा कालावधी 18 जानेवारीला समाप्त झाला होता.

लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी लखवीला गेल्या महिन्यात 18 डिसेंबरला दहशतवाद विरोधी कोर्टाने पुरेशा पुराव्यांच्या अभावामुळे जामीन दिला होता. पाकिस्तान सरकारने त्याला शांततेस धोका निर्माण करण्याची शक्यता असल्याच्या आरोपात तुरुंगात ठेवण्याची विनंती केली होती. इस्लामावाद हायकोर्टाने ती विनंती फेटाळून लावली होती. त्यानंतर सरकारने लखवीला अपहरणाच्या एका जुन्या प्रकरणात अडकवून तुरुंगात अटकेत ठेवले आहे.