Home | International | China | zardari dreams of free borders between china and pakistan

झरदारी पाहताहेत स्वप्न पाकिस्तान-चीनच्या मुक्त सीमेचे

agency | Update - Sep 02, 2011, 04:59 PM IST

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे चीनप्रेम उघड होत चालले आहे.

 • zardari dreams of free borders between china and pakistan

  बीजिंग- पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे चीनप्रेम उघड होत चालले आहे. झरदारी सध्या चीनच्या दौऱयावर असून, त्यांनी पाकिस्तान व चीन यांच्यादरम्यान अधिक मैत्री दृढ व्हावी असे म्हटले आहे. तसेच, या दोन्ही देशाच्या सीमा एकमेंकासाठी मुक्त असाव्यात, असेही म्हटले आहे.
  हे वक्तव्य त्यांनी चीनच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
  ते म्हणाले, मी एक स्वप्न पाहिले आहे की, चायनीज लोक पाकिस्तानमध्ये व पाकिस्तान लोक चीनमध्ये कोणत्याही पारपत्राशिवाय (पासपोर्ट) लवकरच प्रवास करावेत. पाकिस्तान आणि चीन यांचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. भविष्यात त्याला एक ऐतिहासिक किनार लागावी, असे मला मनोमन वाटते. पाकिस्तान-चीन दरम्यान चांगले संबंध रहावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
  चीनमधील संवेदनशील प्रांत असलेल्या झिजियांगमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी घडवलेल्या हिंसाचाराच्या घटनेची त्यांनी दखल घेतली.
  त्यामुळेच झरदारींनी झिंगजिआंग प्रांताला भेट दिली. झिजियांगमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी घडवलेल्या हिंसाचारात चीनी पोलिस अधिका-यांसमवेत 15 जण ठार झाले होते. त्यानंतरही एका बॉम्बस्फोटात आणि हिंसाचारात आणखी सात जण ठार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी चार संशयीतांना गोळ्या घालून ठार केले होते, तर चौघांना ताब्यात घेतले होते.
  18 जुलै रोजी पोलिस ठाण्यावर हल्ला करून 4 जणांची हत्या करणा-या 14 दंगेखोरांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले होते. झिजियांग प्रांतात कट्टरवादी मुस्लीम उईघर अतिरेकी 2009 पासून आजपर्यंत 200 नागरिकांना ठार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
  झरदारी यांचा तीन दिवसाचा दौरा आज संपला. त्यापूर्वी चीनमधील अनेक महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींसोबत चर्चा केली. 'चीन-पाकिस्तान संबंध सुधारणे, दोन्ही राष्ट्रांमधील व्यापारात वाढ करणे आदी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या दौऱयात चायना डेव्हलपमेंट बॅंक, ओरिएंट ग्रुप, फोटान, गोल्डविंड या उद्योग समूहालाही झरदारी यांनी भेटी दिल्या.

Trending