आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zardari Tells Sindh To Frame Law To Prevent Forced Conversion

अल्‍पसंख्‍यांकांचे बळजबरी धर्मांतर रोखण्‍यासाठी पाकिस्‍तानत कायदा होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अल्पसंख्याकांचे जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार रोखण्‍यासाठी घटनादुरुस्‍ती करुन नवा कायदा करावा, अशी सूचना पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी दिले आहेत.
गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये हिंदुंचे अपहरण आणि बळजबरी धर्मांतराचे प्रकार वाढले आहेत. त्‍यावर जगभरात चिंता व्‍यक्त होत आहे. यासंदर्भात झरदरी यांनी गुरुवारी कराचीमध्ये एक विशेष बैठक घेतली होती. त्यात सिंधचे मुख्यमंत्री कैम अली शाह यांच्यासह प्रांतीय कायदामंत्री अय्याझ सूमरो आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एक समिती स्‍थापन करुन कायद्याचा मसूदा करण्‍याचे निर्देश झरदारी यांनी बैठकीत दिले. समितीमध्‍ये लोकप्रतिनिधी आणि हिंदू पंचायतीचे सदस्य समाविष्‍ट असतील.
झरदारी यांची बहिण खासदार फरयाल तालपूर आणि मुख्‍यमंत्र्यांनी सिंध प्रांतातील परिस्थितीबाबत माहिती दिली. त्‍यानंतर झरदारी यांनी हा निर्णय घेतला.
पाकिस्तानातील हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर होत असलेले स्थलांतर केवळ चर्चा आहे. अशा बातम्‍यांमध्‍ये तथ्‍रू नाही. परंतु, बळजबरी धर्मांतराविरोधात कायदा करावा, अशी मागणी हिंदू समुदायातर्फे होत असल्‍याची माहिती मुख्‍यमंत्र्यांनी झरदारी यांना दिली.
झरदारी यांनी अलिकडेच केंद्रीय मंत्री मौला बक्ष चांदियो यांच्या अध्यक्षतेखाली तीन संसद सदस्यांची एक समिती नेमली आहे. सिंध प्रांतातील हिंदू नेत्‍यांची भेट घेऊन ही समिती चर्चा करणार आहे.
पाकिस्‍तानात हिंदू अल्‍पवयीन मुलीचे अपहरण
पाकिस्‍तानात हिंदू तरुणाच्‍या मुस्लिम धर्मांतराचे थेट प्रक्षेपण
पाकिस्‍तानात प्राचीन हिंदू मंदिराची तोडफोड, हल्‍लेखोरांकडून मुर्तींचीही चोरी
पाकिस्तानातील हिंदू तरुणी म्हणतात, आम्ही शौहरकडेच राहणार