आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zardaris Closest Lawyers Licence Cancel, Sc, Pakistan

सुप्रीम कोर्टाकडून झरदारींच्या निकटवर्तीय वकिलाची सनद रद्द, सरकारचेही एक पाऊल पुढे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांना सुप्रीम कोर्टाने आणखी एकदा दणका दिला आहे. झरदारी यांचे निकटवर्तीय व बेनझीर भुट्टो यांचे सहकारी राहिलेले वकील बाबर अवान यांची सुप्रीम कोर्टाने सनद रद्द केली आहे. कोर्टाचा अवमान झाल्याच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर अवान यांनी न दिल्याने सुप्रीम कोर्टाने हे पाऊल उचलले. असे असली तरी अवान यांची सनद रद्द होताच गिलानी सरकारने अवान यांच्याकडे कायदा मंत्रालय देण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे सरकार एक पाऊल पुढे टाकत असल्याची चर्चा आहे.
बाबर अवान यापूर्वीही झरदारी यांच्या सरकारचे कायदामंत्री होते. मात्र त्यानंतर मौला बक्श चांदियो यांच्याकडे हे मंत्रालय सोपविले होते. आता पुन्हा एकदा अवान यांच्याकडेच हे मंत्रालय देण्यात येणार आहे.
सत्तारुढ पीपीपीचे वरिष्ठ नेते खुर्शीद शाह यांनी पत्रकारांना सांगितले की, अवान यांना कायदामंत्री बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमांत येत असलेल्या वृत्तांत म्हटले आहे की, अवान यांना एक-दोन दिवसात मंत्रीपदाची शपथ देण्यात येईल.
दुसरीकडे, देशातील भ्रष्टाचारावर नजर ठेवणारी सगळ्यात मोठी संस्था 'नॅशनल अकाऊंटिबिलीटी ब्युरो' (एनएबी) पंतप्रधान गिलानी यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याच्या विचारात आहे. गिलानींनी पाकिस्तानच्या 'ऑइल ऍण्ड गॅस डेव्हलपमेंट कंपनी'चे अध्यक्ष ख्वाजा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले असतानाही त्यांची नियुक्ती केली होती. एएनबी हा खटला सुरु करण्याच्या विचारात असून त्यात गिलानी दोषी आढळल्यास त्यांना १४ वर्षाची शिक्षा होऊ शकते. गिलानी यांना १९ जानेवारीला सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
झरदारी-कयानी यांच्यात पॅचअप? तणाव निवळणार