Home | International | Pakistan | zardaris personal secreats cought news corporation

मर्डोक यांच्या कंपनीने मिळविली झरदारी यांच्या खासगी आयुष्यातील माहिती

agency | Update - Jul 21, 2011, 07:55 PM IST

रुपर्ट मर्डोक यांच्या न्यूज कार्पोरेशन कंपनीने अनेक नामवंत व सेलिब्रेटीचे फोन हॅकिंग केल्याने खळबळ उडाली होती. आता यात आणखी नामवंताचा समावेश झाला आहे.

  • zardaris personal secreats cought news corporation

    लंडन- रुपर्ट मर्डोक यांच्या न्यूज कार्पोरेशन कंपनीने अनेक नामवंत व सेलिब्रेटीचे फोन हॅकिंग केल्याने खळबळ उडाली होती. आता यात आणखी नामवंताचा समावेश झाला आहे. या नामवंताचे नाव आहे पाकिस्तान देशाचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी. मर्डोक यांच्या कंपनीने जगभरातील अनेकांची खासगी मिळवून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे बिंग फुटताच त्यांच्यावर एका मागून एक संकट येत आहेत.
    झरदारी यांची माहिती एक खासगी डिटेक्टीवच्या सहाय्याने मिळविल्याचे उघड झाले आहे.
    झरदारी हे माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती आहेत. भुट्टो यांची हत्या २००७ मध्ये पाकिस्तानमध्ये झाली होती. तेव्हापासून झरदारी व भुट्टो यांचा मुलगा बिलावल व मुलगी यांचे वास्तव्य लंडनमध्येच आहेत. शिवाय झरदारी जरी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असले तरी ते बहुतांश वेळ आपला लंडनमध्येच घालवतात. त्यामुळेच त्यांच्या खासगी आयुष्याबाबत उत्सुकेतपोटी छुपी माहिती घेतली गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Trending