आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zuckerberg Joins Protests Against Anti piracy Bills ‎

अमेरिकेतील पायरसीविरोधी कायद्याला मार्क झुकेरबर्गचाही विरोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - इंटरनेट पायरसीविरोधातील प्रस्तावित कायद्याला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यानेही कडाडून विरोध केला आहे. पायरसीविरोधात अमेरिकी कॉंग्रेसमध्ये दाखल करण्यात आलेली 'स्टॉप ऑनलाईन पायरसी ऍक्ट' (सोपा) आणि 'प्रोटेक्ट आयपी ऍक्ट' (पीपा) ही विधेयके काही या प्रश्नावरील उत्तर नाही. हे कायदे अस्तित्त्वात आल्यास पायरसी कमी होण्यापेक्षा इंटरनेटच्या मूळ संकल्पनेलाच धोका पोचेल, असे झुकेरबर्ग याने फेसबुकवरील आपल्या 'वॉल'वर लिहिले आहे.
अधिकाधिक खुले आणि परस्परांशी जोडलेले विश्व तयार करण्यात इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावते आहे. काही चुकीच्या कायद्यांमुळे इंटरनेटच्या विकासात आपण कोणत्याही प्रकारची आडकाठी आणता कामा नये, असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या 'पोस्ट'ला दोन तासांतच तीन लाखांहून अधिक फेसबुककरांनी लाईक केले.
सोपा आणि पीपा या प्रस्तावित कायद्यांना फेसबुक विरोध करीत आहे आणि यापुढेही इंटरनेटच्या मूळ संकल्पनेला बाधा पोचविण्याऱया कोणत्याही कायद्याला आम्ही विरोधच करू, असेही झुकेरबर्ग याने लिहिले आहे.
पायरसी कायद्याविरोधात विकीपीडियाचे बुधवारी ब्लॅकआऊट!