आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zumpa Lahiri, Anita Raghvan Book In Top 100 Books

झुंपा लाहिरी, अनिता राघवन यांची पुस्तके जगातील टॉप 100 मध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय वंशाच्या लेखिका झुंपा लाहिरी व अनिता राघवन यांच्या पुस्तकांचा समावेश जगातील आघाडीच्या 100 पुस्तकांमध्ये करण्यात आला.लाहिरी यांची कादंबरी ‘द लोलँड’ला न्यूयॉर्क टाइम्सच्या 100 नोटेबल बुक्स ऑफ 2013 मध्ये स्थान मिळाले आहे. यादीत अनिताच्या ‘द बिलिनियर्स अप्रेंटाइस : द राइज ऑफ इंडियन अमेरिकन एलिट अँड द फॉल ऑफ गॅलियॉन हेज फंड’ हे पुस्तक त्यात समाविष्ट झाले आहे. बुकर पुरस्कारप्राप्त झुंपा यांची कादंबरी कोलकात्यामधील दोन भावांची कथा सांगणारी आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या आठवड्यात थँक्स गिव्हिंग डेच्या निमित्ताने 21 पुस्तकांची खरेदी केली. त्यात झुंपा यांच्या पुस्तकाचाही समावेश आहे.
विद्यापीठांतही भारत
द टाइम्स हायर एज्युकेशन मॅगझिनने उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या आघाडीच्या 100 शैक्षणिक संस्थांची यादी तयार केली आहे. पंजाब विद्यापीठ 13 वे, आयआयटी खडगपूर 30 वे, आयआयटी कानपूर 34 वे, आयआयटी दिल्ली व रुरकी 37, आयआयटी गुवाहाटी 46, तर आयआयटी मद्रास व जाधवपूर विद्यापीठ 47 व्या स्थानी आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठ 50 व्या आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यादीत 57 व्या स्थानी आहे.