Home | Jokes | Badle Ki Aag | Funny Joke on grandfather and one young boy

Funny: तरूणानी आजोबांना विचारली वेळ आणि डोके आपटून घेतले, वाचा भन्नाट जोक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2015, 03:29 PM IST

स्थळ - सारसबाग, पुणे एक आजोबा गार्डन मधे बसले होते. तेव्हा त्यांच्या जवळ एक तरूण आला आणि त्याने आजोबांना किती वाजले म्हणून विचारले... तेव्हा ते आजोबा म्हणाले... आज तुम्ही टाइम विचारला. उद्या पण विचाराल, कदाचित परवा पण विचाराल.. तरुण : कदाचित हो..

 • Funny Joke on grandfather and one young boy
  स्थळ - सारसबाग, पुणे 
  एक आजोबा गार्डन मधे बसले होते. तेव्हा त्यांच्या जवळ एक तरूण आला आणि त्याने आजोबांना किती वाजले म्हणून विचारले... 
  तेव्हा ते आजोबा म्हणाले... 
  आज तुम्ही टाइम विचारला. उद्या पण विचाराल, कदाचित परवा पण विचाराल..
  तरुण : कदाचित हो..
  आजोबा : मग आपली ओळख होईल, आपण रोज भेटू...
  तरुण : कदाचित हो...
  आजोबा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण नात आहे, तिला पाहातक्षणी प्रेमात पडाल 
  तरुण : लाजून, कदाचित होssss...
  आजोबा: मग तुम्ही तिला भेटायला वरचेवर माझ्या घरी यायला लागाल
  तरुणः अजून लाजून... हो ना... 
  आजोबाः मग तुमचे प्रेम वाढत जाईल, तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही...
  तरुण : हसून हो...
  आजोबा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी घालाल..... 
  तेव्हा......
  तरुणः (उत्सूकतेने) तेव्हा.... तेव्हा काय.... 
  आजोबाः तेव्हा मी तुम्हाला सांगेन...
  हराम खोर, नालायक माणसा. ज्याच्याजवळ साधे स्वत:चे घड्याळ घ्यायची लायकी नाही... 
  अशा मुलाबरोबर मी माझ्या नातीचे लग्न करून देऊ शकत नाही..
   

Trending