आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Facts: मुलगी पटल्यावर मुलांना कळते २००-२५० रुपयांचेही चॉकलेट असते, वाचा आणि हसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. बदलत्या काळानुसार प्रत्येक आईवडीलांनी ही गोष्ट समजून घ्यावी की, मुलांना पराठे आणि मुलीला कराटे येणे गरजेचे आहे.
2. भारतातीले लोक हेलमेट घालणार नाहीत, पण मोबाईलला स्क्रीनगार्ड नक्की लावणार. म्हणजे डोकं फुटून रक्त वाहत गेलं तरी चालेल, पण मोबाईल स्क्रीनला स्क्रॅच नाही आला पाहिजे.
3. मला देशाच्या गरिबीविषयी तेव्हा माहित झाले, जेव्हा कोणीतरी माझ्या बाईकचा कपडा गायब केला.
4. सध्या शाळेत सुरू असलेल्या उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांच्या आधी झेरॉक्स वाल्यांना असते.
5. गर्लफ्रेंड पटवल्यानंतरच मुलांना कळते की, 200-250 रुपयांचेसुध्दा चॉकलेट्स असतात.
6. आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो. अन् हे लोक ३ रूपयांचा पेनसुद्धा दोरीने बांधून ठेवतात.