आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: शेतकऱ्याच्या उत्तरांनी परेशान झाला पत्रकार, गेला कुंभमेळ्याला; वाचा धमाल जुगलबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांच्या बकऱ्यांची जिल्ह्यात खुपच चर्चा असते, म्हणून एक पत्रकार त्या शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी जातो...

पत्रकार: तुम्ही या बकऱ्यांना काय खाऊ घालता...?

शेतकरी: काळ्या बकरीला का पांढऱ्या बकरीला..??

पत्रकार: पांढऱ्या बकरीला..??
शेतकरी: चारा

पत्रकार: आणि काळीला ...??
शेतकरी: तिला सुध्दा चाराच खाऊ घालतो.

पत्रकार: तुम्ही या बकऱ्यांना कुठे बांधता..?
शेतकरी: काळीला का पांढरीला..??

पत्रकार: पांढऱ्या..
शेतकरी: बाहेरील अंगणात

पत्रकार: आणि काळीला...?
शेतकरी: तिला सुध्दा बाहेरील अंगणात...

पत्रकार: तुम्ही यांना आंघोळ कशी घालता..??
शेतकरी: कोणाला काळीला का पांढरीला..??

पत्रकार: काळीला...
शेतकरी: विहिरीच्या पाण्याने..

पत्रकार: आणि पांढरीला..?
शेतकरी: तिलाही विहिरीच्या पाण्यानेच..

पत्रकाराला खुप राग येतो. तो शेतकऱ्याला रागात म्हणतो "अहो, तुम्ही दोन्ही बरऱ्यांचे संगोपन एकसारखेच करता, तर मला वारंवार का विचारता की काळी की पांढरी.. असे ??

शेतकरी: कारण काळी बकरी माझी आहे.

पत्रकार: आणि पांढरी...?
शेतकरी: ती सुध्दा माझीच आहे!

हा पत्रकार आता नोकरीसोडून कुंभमेळ्याला गेलाय.