आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: बंड्याच्या बॉसची शेवटची इच्छा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंड्याचा बॉस हॉस्पिटलमधे खुप आजारी होता. तोंडाला ऑक्सिजन पाईप व दोन चार नळ्या होत्या. बंड्या त्यांना भेटायला हॉस्पिटममधे गेला.
बॉसला घाबरल्यासारखे झाले. त्याला घाम फुटला, त्याला बोलतासुध्दा येत नव्हते. त्यांने बंड्याला काहीतरी लिहायचा इशारा केला. बंड्याने लगेच आपल्या हातातला कागद व पेन दिल. बॉसने काहीतरी लिहिले आणि मग बंड्याने तो कागद खिशात ठेवला. त्यानंतर थोड्याच वेळात बंड्याच्या बॉसने मान टाकली.
अंत्यसंस्कारावेळी बॉसची शेवटची इच्छा वाचण्यासाठी बंड्याने कागद काढला व वाचण्यास सुरूवात केली....
"गाढवा, तू ऑक्सिजनच्या नळीवर उभा आहेस"