आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE: जेव्हा बिहारी आणि बारामतीकराची होते भेट, वाचा भन्नाट पोटधरून हसवणारा जोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक बिहारी ट्रेन मध्ये प्रवास करत असतो.
समोर आपला गोप्या बसलेला असतो,
बिहारी भैय्या गोप्याला विचारतो," ईथे कुठली शहरे फिरायच्या लायकीची नाहीत ?"
गोप्या :" मुंबई, नाशिक, सातारा, पुणे आणि बारामती...."
बिहारी : का, ही शहरे भारतात नाहीत का ?"
गोप्या: " नाही...ही शहरे म्हणजे स्वत:च एक महाभारत आहेत...."
बिहारी : " बरं बरं;म्हणजे या शहरात फिरणं म्हणजे धोक्याच आहे.."
...
काही वेळाने
बिहारी : "पण मी कस ओळखु कि कुठला माणुस कुठल्या शहराचा आहे ?
गोप्या: " भावड्या तु बसुन रहा . अजून बराच प्रवास बाकी आहे. मी तुला सगळ्यांना भेटवीन."
[काही वेळातच एक मुंबईकर सुट बूट ईन घालुन शेजारी येऊन बसतो]
गोप्या : "भैय्या हा मुंबईकर आहे ..."
बिहारी : "मी याच्या बरोबर बोलु कसा ?"
गोप्या : "चुपचाप थांब व तुझ्या शर्टाची ईन कर, तोच तुझ्याशी बोलेल"
भैय्याने एकदम थाटात त्या मुंबईवाल्या समोर धोतरात शर्टाची ईन केली.
मुंबईकर उठला आणि त्यानी बिहार्याच्या दोन कानाखाली लावल्या -" बिना पँटची ईन तुझ्या खानदानात कुणी केली होती रे ..?"
-
-
थोड्या वेळाने एक पुणेकर येऊन बसला ...
गोप्या : 'भैय्या हा पुण्याचा माणुस आहे ...'
बिहारी : "मी याच्या बरोबर कसा बोलू बर ?"
गोप्या : "याला म्हण, पुण्यात अंडी का बरं महाग.."
बिहारीने पुण्यावाल्याला हे विचारले..
पुणेकर उठला आणि जोराचा थप्पड़ लावला - "साल्या ब्राम्हण आहे आम्ही... अंडी खात नाहीत. समजल का !"
-
थोड्या वेळाने एक सातार्याचा माणुस येऊन बसला ...
गोप्या : 'भैय्या हा साताऱ्याचा माणुस आहे ...'
बिहारी : "मी याच्या बरोबर कसा बोलू आता ?"
गोप्या : "याला म्हण, अजित पवार कि जय.."
साताऱ्याचा माणुस उठला आणि भैय्याला जोराचा गुद्दा लावला - " भोसले महाराजां चा विजय असो. आमचे राजे, ऊदयन राजे."
थोड्या वेळाने एक नाशिक चा माणुस येऊन बसला ...
गोप्या : 'भैय्या हा नाशिक चा माणुस आहे ...'
बिहारी : "मी आता याच्या बरोबर कसा बोलू ?"
गोप्या : "याला म्हण, राज ठाकरे ने महाराष्ट्रचे वाटोळं केल.."
बिहारी ने नाशिक वाल्याला हे सांगीतले..
नाशिककर साहेब उठले आणि बिहारीला लाथा बुक्कयांनी तुडवला.
-
-
परेशान झालेल्या भैय्या ने तळमळत विचारल, " भाऊ सगळ्याच शहरातल्यांना भेटवल, आता मी परत जातो. जाता जाता एक ईच्छा पुर्ण कर. बारामती कर असला एखादा तर तो ही दाखव !!

गोप्या म्हणला - " बावळ्या मग तुला ईतका वेळ मार खाऊ घालायला कारणीभुत कोण होत..!
बातम्या आणखी आहेत...