आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Joke On Child And Chocolate In Divyamarathi

Funny:मुलाचा प्राणाणिकपणा पाहून दुकानदार खुश, मात्र उत्तर ऐकताच आई हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला.
मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच त्या दुकानदाराने त्याच्यासमोर चॉकलेटचा डबा समोर धरला आणि म्हणाला.
'घे तुला हवे तितके चॉकलेटस.!
मुलाने नम्रपणे नकार दिला. आपण दिला तर मी घेईन असे म्हटले.
'दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले, त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले.
मुलगा आनंदाने घरी गेला.
घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.
'का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का?
'त्यावर मुलगा म्हणाला.. 'मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन किंवा चार चॉकलेटस् आले असते, पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले.