Joke : वजन / Joke : वजन कमी करण्याचा एकदम भन्नाट उपाय, वाचाल तर लोटपोट होऊन हसाल

दिव्य मराठी वेब टीम

Oct 10,2015 04:01:00 PM IST
वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय
एका ढोल्या माणसाने वृत्तपत्रात जाहिरात वाचली.
एका आठवड्यात ५ किलो वजन कमी करा, वजन कमी नाही झाले तर संपूर्ण पैसे परत.
त्याने ताबडतोब जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर फोन केला.
फोन एका महिलेने उचलला आणि म्हणाली तुमच्या ट्रेनिंगसाठी तुम्ही सकाळी 6 वाजता तयार रहा..
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या दाराची बेल वाजली. दार उघडताच दारात एक खुपच सुंदर तरूणी जॉगिंग सुट घालून उभी असल्याचे दिसली.
तरूणी म्हणाली, "तुम्ही जर मला पकडले तर तुम्ही माझ्यासोबत वाट्टेल ते करू शकता."
एवढे म्हणून ती तरूणी पळायला लागली.
हा ढोल्यासुध्दा तिला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे ५ किमी धावला मात्र तो तिला पकडू नाही शकला.
असे आठवडा भर चालले. मात्र तो व्यक्ती तिला पकडूच शकला नाही.
मात्र त्याचे ५ किलो वजन कमी झाले.

त्यानंतर त्या ढोलूने पुन्हा त्या जाहिरात कंपनीला फोन केला १० किलो वजन कमी करण्याच्या प्रोग्रॅमबद्दल विचारले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या दाराची बेल वाजली. दार उघडताच दारात पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि मादक तरूणी जॉगिंग सुट घालून उभी असल्याचे दिसली. तरूणी म्हणाली, "तुम्ही जर मला पकडले तर तुम्ही माझ्यासोबत वाट्टेल ते करू शकता."
एवढे म्हणून ती तरूणी पळायला लागली.
हा ढोल्यासुध्दा तिला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे 10 किमी धावला मात्र तो तिला पकडूच नाही शकला.
असे आठवडा भर चालले. मात्र तो व्यक्ती तिला पकडूच शकला नाही.
यामध्ये त्याचे 10 किलो वजन कमी झाले.

त्या ढोलूला ही आयडीया खुप आवडली. त्याने आता २५ किलो कमी करण्याचा प्रोग्रॅमसाठी विचारणा केली.
तेव्हा कॉलसेंटरवाली तरूणी म्हणाली, यासाठी तुमचा ठाम निर्धार हवा. कारण हा प्रोग्रॅम थोडा कठीण आहे.
ढोलू म्हणाला मॅडम माझी पुर्ण तयारी आहे. तुम्ही मला हा प्रोग्रॅम द्या.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोटू पहाटेच उठून जॉगिंग सुट घालून तयार झाला. सकाळी ६ वाजता दरवाज्यावरील बेल वाजली.
या मोटूने आनंदाने दरवाजा उघडला, पाहातो तर काय एक ७ फुट उंच एकदम दांडगा निग्रो दारात उभा होता..
निग्रो म्हणाला, "जर मी तुम्हाला पकडले, तर मी मला जे वाट्टेल ते तुमच्यासोबत करेल"
पुढे काय झाले असेल याचा विचार तुम्हीच करा...
X
COMMENT

Recommended News